नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – इगतपुरी तालुक्यातील धामणी येथे मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जात आहे. सदरचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून सततच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना मोठ्या प्रमाणात तडे जाऊन पडझड झाली आहे. शेताच्या पाईप लाईनचे नुकसान झाले आहे. घरांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून धामणीतील अनेक महिलांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
संबंधित कंपनी कडून जो पर्यंत घरांची नुकसान भरपाई मिळत नाही व समृद्धी लगतचे गावातील सर्विस रस्ते जो पर्यंत दुरुस्त करून मिळत नाही, तो पर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा या महिलांनी घेतला आहे.