नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – सामान्य मुलांपेक्षा वेगळे असणाऱ्या गतिमंद विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांना बाजारपेठेत मागणी आहे.विशेष म्हणजे या मुलांना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून दिले जाते. डोंबिवलीतील अनेक शाळा व सामाजिक संस्थानी या राख्या विकतही घेतल्या आहेत.वर्षातील अनेक सणात ही मुले आपल्या कलेने वस्तू बनवत असून या मुलांना लागणारा शैक्षणिक खर्च यातून निघू शकेल याकरता समाजाने या वस्तू विकत घ्यावा असे आवाहन क्षितिज संचालिका गतिमंद मुलांच्या शाळेतून करण्यात आले आहे.
रस्त्यावर एका पालकांला आपले मूल घेऊन जात असताना अनिता दळवी यांनी पाहिले. यात हे मूल गतिमंद असल्याचे पाहून दळवी यांनी अश्या मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असा निर्णय घेत त्यांनी डोंबिवलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 25 वर्षांपूर्वी डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील वैभव मंगल कार्यालयाजवळ दळवी यांनी गतिमंद मुलांसाठी शाळा सुरू केली.क्षितिज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर वस्तू बनवणे, नृत्य, गायन शिकविले जाते.विशेष म्हणजे गतिमंद मुलांना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.या मुलांनी बनविलेल्या राख्या सुंदर आणि आकर्षित असतात की बाजारपेठ दरवर्षी मागणी असते. इतकेच नव्हे तर डोंबिवलीतील ग्रीन इंग्लिश स्कुल, रॉयल शाळा, विद्यानिकेतन, विद्या सागर, पाटकर ज्युनियर कॉलेज,केब्रीज विद्यालय आणि स्नेह बंधन महिला मंडळ या मुलांनी बनविलेल्या राख्या दरवर्षी विकत घेतात.
या मुलाचे पालक गरीब असल्याने त्याचा शैक्षणिक खर्चही करणे पालकांना जमत नाही.संस्था आपल्या परीने मुलांना शिक्षण देण्याचे काम करते.म्हणूनच समाजातील दानशूर व्यक्तींनी गतिमंद मुलांच्या शैक्षणिक खर्च करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन संस्थेच्या संचालिका दळवी यांनी केले आहे.