नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – नाशिक मध्ये अनेक दिवसांपासून शेतकरी वर्गाला मोठ्या आडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण मार्च अखेर तसेच इतर सुट्ट्यासह कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेला संघर्ष यामुळे गेल्या ८ दिवसांपासून येवला, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यातील कांदा,धान्य यासह इतर शेतमालाचे लिलाव बंद असल्याने रोज होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
एक एप्रिल पासून कांदा व्यापाऱ्यांनी हमाली तोलाई न देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे सध्या कांदा व्यापारी व माथाडी बोर्ड यांच्यामध्ये संघर्ष सुरू असून यामुळे बाजार समितीतील सर्व लिलाव बंद आहे.तरी या संदर्भात कांदा व्यापाऱ्यांची बैठक होणार असून पुढील रणनीती कांदा व्यापारी ठरवणार आहे. तरी जी हमाली तुलाई द्यावी लागते ती देणार नाही अशा निर्णयावर कांदा व्यापारी ठाम आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्याने याचा फटका नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून लवकरच कांदा व्यापारी माथाडी कामगार यांनी यांच्यातील संघर्ष सरकारने लक्ष घालून मिटवावे. जेणेकरून लवकरात लवकर कांदा लिलाव सुरळीत होऊन कांदा विक्री करता येईल. तरी जो शेतकऱ्यांकडून हमाली तोलई घेतली जाते. ती देखील यापुढे घेऊ नये असे देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे असून लवकर बाजार समिती सुरू करावे अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आ