नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – आज धुळे शहरात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर येत असून शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. एकीकडे राज्यात सर्वच राजकीय लोकांना मराठा समाजाकडून बंदी घातली जात असताना दुसरीकडे मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागताचे लावण्यात आलेले बॅनर हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे
धुळे शहरात आजपासून मराठा समाजाच्या साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली असून दुपारच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे आदिवाशी एल्गार सभेसाठी आले होते. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागताचे लावण्यात आलेले बॅनर हा सगळ्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.