Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image राजकीय

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मुस्लिम संघटना उतरणार आंदोलनात

प्रतिनिधी.

मुंबई – केंद्र सरकारने तीन कृषीविधेयक बिल पारित केले. ते बिल मागे घेण्यात यावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत लाखो शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र केंद्र सरकार त्यांना दाद द्यायला तयार नाही. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच अनेक मुस्लिम संघटना येत्या २७ जानेवारी रोजी राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करणार असून त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. शाईन बागच्या धर्तीवर किसान बाग असे या आंदोलनाचे स्वरूप असेल.केंद्रात सत्तेवर आलेले भाजपा सरकार मनमानी कारभार करीत असून देश विरोधी कायदे तयार करीत आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहे. सीएए व एनआरसी हे त्यापैकीच तयार करण्यात आलेले कायदे आहेत. याला देशातील अनेक नागरिकांनी विरोध केलाय. आता केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावण्यासाठी कायदे केले असून नुकतेच तीन कृषी विधेयक बिल पास केले आहे. त्याचा फायदा केवळ मोठ्या उद्योगपतींना होणार असल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्य शेतकरी मात्र या कायद्यामुळे अडचणीत आला आहे. कृषी विधेयक बिल मागे घेण्यात यावे म्हणून गेले दोन महिने शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकार हे बिल मागे घेण्यास तयार नाही. यापूर्वी शाईन बाग आंदोलनात सर्व धर्मियांनी सहभाग घेऊन मोठे आंदोलन केले होते. आजही कृषी विधेयक बिला विरोधात आंदोलन चालू असून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शाईन बागच्या धर्तीवर किसान भाग आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम संघटनांनी दिला असून त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. येत्या २७ जानेवारी रोजी राज्यातील विविध भागात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Translate »
X