नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणारे स्टील चोरी करून बांधकाम व्यावसायिक व स्टील व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मानपाडा पोलिसांनी भांडा फोड केला आहे. विशेष म्हणजे चोरांनी आपली चोरी लपवण्यासाठी स्टीलचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या वजनकाटयात इलेक्ट्रॉनिक चिप लावून रिमोट द्वारे मालाचे वजन वाढविण्याचे काम करत होते. मात्र पोलिसांनी या टोळीतील 7 आरोपीना बेड्या ठोकत २ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत इलेक्ट्रॉनिक चिप बनवणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहे
कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामाचे प्रोजेक्ट सुरू असून या बांधकामासाठी लागणारे स्टील रायगड जालना व अमरावती परिसरातून येत असून या स्टीलची चोरी करून बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक होत असल्याचा गुन्हा गेल्या काही दिवसा पूर्वी मानपाडा पोलीस स्थानकात दाखल झाला होता या गुन्हाचा तपास करत मानपाडा पोलिसांनी
फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ७ आरोपींना अटक केली आले. नितीन चौरे, दिदिारसिंग मंगलसिंग राजु, दिलबागसिंग हरबन्ससिंग गिल, फिरोज मेहबुब शेख, शिवकुमार उर्फ मिता गिलई चौधरी, हरविंदरसिंग मोहनसिंग, हरजिंदरसिंग बलबीरसिंग राजपुत असे अटक करण्यात आले आरोपींचा नाव असून हे आरोपी ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक व मालक यांना हाताशी धरुन कंपनीतुन स्टीलचा माल निघल्यानंतर त्यातील काही माल भंगार व्यवसायीकांस विकुन, उर्वरीत माल हा बांधकाम व्यवसायीकाना देत त्याची फसवणूक करत होते विशेष म्हणजे स्टील खरेदी करणाऱ्या विकासात व इतर कंपन्यांना फसवण्यासाठी ही टोळी मेंटेनन्स च्या नावावर ट्रकचे वजन करणाऱ्या वजन काट्याच्या आत कंट्रोल चिप लावून स्टील ने भरलेला माल काट्यावर आल्यानंतर स्वतःला गाडीचा ट्रान्सपोर्टर सांगत रिमोट कंट्रोल च्या माध्यमातून मालाचे वजन वाढवून फसवणूक करत होते सध्या पोलिसांनी या आरोपींकडून मालवाहु ट्रक, स्टील, इलेक्ट्रॉनिक चीप, रिमोट, मोबाईल फोन असा एकंदरीत २ कोटी ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चीप बनवणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध सुरू केला आहे