नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – किरकोळ कारणावरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्व टाटा पावर परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शैलेश शीलवंत असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी आरोपी किरण शिंदे याला मानपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहे.विशेष म्हणजे आरोपी हा औरंगाबाद येथे पलायन करण्याच्या तयारीत असताना मानपाडा पोलिसांनी त्याच्यावर झडप घालत एका तासाच्या आत बेड्या ठोकली आहेत.
मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे पोलिसांच्या हाती काही सुगावा नव्हता अखेर सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता आरोपीचा सुगावा लागला. डोंबिवली पूर्व टाटा पावर परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास हत्या घडली. चाकूने भोसकल्यानंतर शैलेश जीव वाचवण्यासाठी काही अंतरापर्यंत पळत गेला. आरोपी किरण देखील त्याच्या मागावर होता मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने काही अंतरावरच शैलेश जमिनीवर कोसळला व त्याचा मृत्यू झाला.
किरकोळ कारणावरून भांडण होऊन हे हत्याकांड घडलं. डोंबिवली पूर्वेकडे कल्याण शिर्डी टाटा पावर परिसरात शैलेश शीलवंत हा तरुण राहतो. शैलेश रिक्षा चालक असून किरण शिंदे यांच्याशी ओळख होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून किरण शैलेशवर संतापला होता. याच वादातून किरणने शैलेशला टाटा पावर परिसरात एका इमारती शेजारी गाठले. शैलेश वर चाकूने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी शैलेशने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही अंतर तो पळाला देखील मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने शैलेश जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेश मदने, सुनील तारमाळे, अविनाश वणवे यांच्या पथकाने तपास सुरू केला. आजूबाजूला चौकशी केली असता कुणी काहीच माहिती देत नव्हते. अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले सीसीटीव्ही मध्ये आरोपी किरण शिंदे शैलेशचा पाठलाग करत असताना दिसून आला. पोलिसांनी शिंदे याची ओळख पटवून त्याला अवघ्या तासाभरात याच परिसरातून अटक केली.आरोपी हा सराईत असून या आदि त्याच्यावर तीन गुन्हांची नोंद आहे.