नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी– मराठा आरक्षणाचे वारे संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे . मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आपल्या जिवाची पर्वा न करता उपोषण केले. सरकारशी सकारात्मक बोलणी झाल्यावर त्यांनी उपोषण स्थगित केले त्यांनतर ते काही दिवस रुग्णालयात होते.रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरे व सभा घेणे सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याण मधील पोटे मैदानात येत्या 20 नोव्हेंबरला रोजी सोमवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा क्रांती मोर्चा कडून सभेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. 20 तारखेला सायंकाळी सहा वाजता कल्याण पूर्व चक्की नाका येथे जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत होणार असून त्यानंतर बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या सभेसाठी पोटे मैदानात स्टेज उभारणे, मॅट टाकणं, जमिनीचे सपाटीकरण ,एलईडी लावणे, शहरात बॅनर लावणे असे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाटील यांच्या सभेसाठी पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. जरांगे पाटील यांच्या सभेच्या निमित्ताने कल्याण मधील सत्ताधारी शिवसेना शिंदे गट ,भाजपा , राष्ट्रवादी तसेच काँग्रेस, आम आदमी पार्टी मधील मराठा नेते एकत्र आल्याचे दिसून येते आहे.