नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अकोला/प्रतिनिधी – शिवसेनेतील पहिल्या फळीतील जेष्ठ नेते मनोहर जोशी यांच आज मुंबईत निधन झाले. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, मनोहर जोशी यांनी दादर येथे पहिल्यांदार कोहिनूर टेक्निकल सुरु केले. त्याचा अनेकांना फायदा झाला आहे. तर त्यांच शिक्षक म्हणून कार्य मोठं आहे. नंतर महापौर झाले, मुख्यमंत्री झाले, स्पीकर झाले आणि त्यांनी पदावर असतांना अनेक गोष्टी कुशलतेने हॅन्डल केल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरे हे एक मोठं नाव असतानाही त्यांच्या बरोबरीत मनोहर जोशींच नाव घेतल्या जायचं आणि त्यातून त्यांच कर्तृत्व आणि कुशलता खूप मोठी आहे. ते आज आपल्यात नाही आहे,असे म्हणून त्यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या परिवार व पक्ष्या कडून श्रद्धजली अर्पण केली.