नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – साताऱ्यातील मूळचे असलेले अभिजीत बिचुकले यांची आज आख्या महाराष्ट्रात खास ओळख तयार झालेली आहे. राजकारण आणि कलाक्षेत्रात बिचुकले हे नाव गेल्या काही वर्षात चांगलंच गाजतंय. या लोकसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकले ही आपले नशीब आजमावत आहेत. कल्याण लोकसभेतून ते अपक्ष उमेदार म्हणून लढणार आहे. त्यांच्यापुढे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचे आव्हान असणार आहे. कल्याण लोकसभेचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले “संसदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी पंतप्रधान मोदीकडे करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्ते रुंदीकरणात जमिनी गेलेल्या नागरिकांना मोबदला मिळावा, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे यासारख्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार आहे. देशाचे राजकारण जातीयवादाकडे झुकत आहे. सभेमध्ये जय श्री रामचे नारे हा आचार संहितेचा भंग असताना निवडणूक आयोग शांत आहे. संविधान वाचले पाहिजे, भारताची एकात्मता अखंडता अबाधित राहायला हवी. या उद्देशाने मी जाहीरनामा प्रसिद्ध केला.”
अभिजित बिचुकले पहिल्यांदाच कल्याणातून लोकसभेची निवडणूक लढत असून त्यांना मुंबईतील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. “लोकांच्या प्रश्नासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून याची जाणीव जनतेने ठेवावी. मुंबईतील जनतेच्या विश्वासावर मी उभा राहिलो आहे. मुंबई माझी कर्मभूमी असून कलाकारांवर वाईट वेळ आली तर मी कलाकारांच्या मागे उभा राहील त्यामुळे मला पाठींबा द्या असे आवाहन अभिजीत बिचकुले यांनी केले आहे.