महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

७ हजारची लाच घेताना बुलढाणा बस डेपोचा मॅनेजर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

नेशन न्यूज मराठी टीम.

बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाणा डेपो मॅनेजरला सात हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बुलढाणा डेपो मॅनेजर संतोष वानेरे यांनी एका चाळीस वर्षीय एसटी महामंडळ कर्मचाऱ्याकडून पंढरपूरला जात असताना एसटीमध्ये स्टोव पेटवून स्वयंपाक केल्यामुळे कारवाई न करण्यासाठी एसटी महामंडळात नोकरीवर असलेल्या आपल्या मावस भाऊ महादेव सावरकर यांच्या माध्यमातून या कर्मचाऱ्याकडे तब्येत 40 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती.

तडजोड अंति पस्तीस हजार रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी तब्बल 28000 रुपये यापूर्वीच आरोपींनी फिर्यादी कडून घेतले होते. मात्र उर्वरित सात हजार रुपये देण्यासाठी या फिर्यादीला आरोपीकडून त्रास दिला जात होता. त्यामुळे कंटाळून त्याने आपली कैफियत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा कडे नोंदवल्यानंतर काल संध्याकाळी खामगाव रोडवरील संत तुकाराम पतसंस्थेजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. काल लाचलुचप प्रतिबंधक विभाग बुलढाणा ने रंगेहात पकडले. शहरातील खामगाव रोडवर काल रात्री दोघांना लाच स्वीकारत असताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळारचून यशस्वीरित्या ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×