महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
आरोग्य लोकप्रिय बातम्या

मेळघाटात दहा महिन्यांत कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण वाढले

नेशन न्यूज मराठी टीम.

अमरावती/प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आरोग्य यंत्रणा बळकट केल्याचा दावा सरकार करीत असताना, एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या दहा महिन्यांमध्ये १५७ बालमृत्यू आणि ७१ उपजत मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मेळघाटात एकूण ७१ नवजातबालकांची मृत्यूंची नोंद झाली आहे. बाल मृत्यूंपैकी ६२ बालकांचा मृत्यू विविध आरोग्य संस्थां मध्ये झाला आहे. आठ बालके रुग्णालयात नेत असताना वाटेत दगावली. धक्कादायक बाब म्हणजे घरी मृत्यू झालेल्या बालकांची संख्या ८७ इतकी आहे. अशी माहिती डॉ.सुभाष ढोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

यावरून असे दिसून येते की आरोग्य यंत्रणा खरोखरच गर्भवती मातेवर लक्ष देतात का?. हा सवाल उपस्थित होतो. बालमृत्यु संदर्भात १९९३ पासून उच्च न्यायालयात याचिका सुरू आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या भागात बालरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. पण तरी देखील या ठिकाणी डॉक्टर सेवा देत नाही. गर्भवती माता व बालकांना पुरेसा आहार मिळत नाही त्यामुळे लाखो रुपये खर्च करून देखिल बालमृत्यू थांबत नसल्याचे दिसत आहे. हा चिंतेचा विषय आहे. तर या ठिकाणी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन योग्य पद्धतीने काम करत नाही. त्यांच्यात समन्वय नाही, असा आरोप याचिकाकर्ते बंड्या साने यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×