नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
गोवा/प्रतिनिधी – “भारताला, चित्रीकरण आणि चित्रपट निर्मितीनंतरच्या प्रक्रियांचे जगभरातले सर्वात पसंतीचे केंद्र बनवण्याचा आपला प्रयत्न आहे, असं सांगत, त्यासाठी, भारतातील कलाकारांची गुणवत्ता आणि या उद्योगक्षेत्रातील धुरीणाचे अभिनव कौशल्य उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन अनुराग ठाकूर यांनी केले आहे. 53 व्या इफ्फी म्हणजे, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या समारंभाला अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती तसेच, प्रेरणादायी भाषणं आणि दर्जेदार कार्यक्रमांनी ह्या महोत्सवाची पणजीत शानदार सुरुवात झाली.
“इफ्फी हा केवळ काही दिवसांचा महोत्सव म्हणून मर्यादित राहू नये, अशी माझी अपेक्षा आहे. ज्यावेळी आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करु, या अमृतमहोत्सपासून सुरु झालेल्या अमृत काळाच्या 25 वर्षांत इफ्फी सुरु राहावा, अशी आमची दृष्टी आहे. भारताला सिनेमा आशयनिर्मितीचे केंद्र बनवण्यासाठी, विशेषतः देशातील प्रादेशिक सिनेमातील आशय निर्मिती अधिक संपन्न करण्यासाठी, प्रादेशिक महोत्सवाची व्याप्ती वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.” असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
अनुराग ठाकूर यांचीच संकल्पना असलेल्या, “उद्याचे 75 सृजनशील कलावंत’ या उपक्रमाविषयी विस्तृत माहिती देतांना त्यांनी घोषणा केली, “की 75 कलावंतांची संख्या ही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाशी संबंधित आहे. देशाच्या स्वातंत्र्यमहोत्सवात, युवा कलावंतांच्या कल्पना आणि प्रतिभाशक्तीला नवे पंख देण्यासाठी, देशी कल्पनांना मंच उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने, गेल्या वर्षी या उपक्रमाची सुरुवात झाली. हा उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृतकाळापर्यंत सुरु राहणार असून, दरवर्षी यात एका कलावंताची भर पडत राहणार आहे.”
इफ्फीची मूलतत्वे ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारलेली
आशियातील या सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाच्या जुन्या स्मृतींना उजाळा, देत अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, या महोत्सवाच्या सुरुवातीपासून म्हणजे,1952 पासून आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामागची दृष्टी आणि मूल्ये, “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेशी घट्ट जुळलेली आहेत. ही संकल्पना, संपूर्ण जगाला एक कुटुंब मानून, शांततामय सहजीवनाचे तत्व मांडणारी आहे. “जागतिक मंचावर भारताचा वाढता प्रभाव आणि जी-20 चं भारताला मिळालेले अध्यक्षपद, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, ‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य” याच संकल्पनेमागचा संकल्प अधिक दृढ करणारे आहे.
इफ्फीमध्ये, भारतीय पॅनोरामा, वर्ल्ड ऑफ सिनेमा, आदरांजली, आणि रेट्रोस्पेकटीव्ह असे पारंपरिक विभाग यंदाही असणार आहेत, त्याशिवाय 53 व्या इफ्फीमध्ये, अनेक सुप्रसिद्ध भारतीय चित्रपटांचे, परदेशी चित्रपटाचे, ओटीटी सिरिजचे, भव्य प्रीमियर शो होणार आहेत. त्यावेळी, सिनेसृष्टितील, दिग्गजही उपस्थित राहणार आहेत. इस्राइलचे प्रसिद्ध कलाकार यावेळी उपस्थित राहतील. एनएफडीसीच्या पव्हेलियनमध्ये फिल्म बाजार, केंद्रीय संपर्क ब्युरोचे मल्टीमिडिया प्रदर्शन, आणि “उद्याचे 75 सृजनशील व्यक्तिमत्वे ” साठीचे 53-तास आव्हान, अशा अनेक उपक्रमांचा या महोत्सवात समावेश असेल, असे ठाकूर यांनी सांगितले.
53 व्या इफ्फीची सुरुवात ऑस्ट्रियन लेखक दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या अल्मा आणि ऑस्कर या उत्कृष्ट चित्रपटाने होत असल्याबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांची उत्सुकता देखील व्यक्त केली. यावर्षीचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळविल्याबद्दल स्पेनचे सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते कार्लोस सौरा यांचे केंद्रीय मंत्र्यांनी अभिनंदन केले. “सौरा गेल्या सहा दशकांहून अधिक काळ चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असून आता वयाच्या नव्वदीतदेखील ते त्यांच्या कॅमेऱ्यासह सक्रीयपणे काम करत आहेत. त्यांच्या संपूर्ण जीवनात त्यांनी खूप मोठ्या संख्येने पुरस्कार तसेच नामांकने मिळवली आहेत. यंदाच्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहोळ्यामध्ये ख्यातनाम चित्रपट निर्माते सौरा यांच्या वतीने त्यांची कन्या अॅना सौरा हा पुरस्कार स्वीकारत आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे,” केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले.
2022 चा इफ्फी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मेगास्टार आणि अभिनेता-निर्माता चिरंजीवी कोनिडेला यांना देण्यात येत असल्याची घोषणा ठाकूर यांनी केली
इफ्फीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या ‘चित्रपट बाजार’ या उपक्रमाचे महत्त्व देखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विषद केले. “चित्रपट बाजार हा जागतिक चित्रपट निर्मिती उद्योग आणि आपली सर्जनशील अर्थव्यवस्था यांच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. याचाच अर्थ असा की, हा बाजार म्हणजे दक्षिण आशियाई चित्रपट साहित्याचा शोध, मदत आणि सादरीकरण तसेच चित्रपट निर्मिती, उत्पादन आणि वितरण या क्षेत्रांतील प्रतिभा यांवर लक्ष केंद्रित केलेले संपूर्ण जगभरातील चित्रपट विक्रेते आणि खरेदीदार यांच्या एकत्रीकरणाचे हे ठिकाण आहे. हा महोत्सव चित्रपट निर्मात्यांना त्यांनी तयार केलेले चित्रपट जगासमोर सादर करण्यासाठी आणि त्यांनी चित्रित केलेल्या विषयांबद्दल सखोलपणे चर्चा करण्यासाठी एक अनोखा मंच पुरवतो.” ते म्हणाले. “इफ्फीने यावर्षी प्रथमच देशांच्या दालनांची सुरुवात करून चित्रपट बाजाराची व्याप्ती वाढविली आहे. चित्रपट बाजार उपक्रमाच्या या 15 व्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांना यातील 40 दालनांना भेट देण्यासाठी आमंत्रित करतो.तसेच यावर्षी प्रथमच इफ्फीमध्ये चित्रपटांच्या जगातील अत्याधुनिक संशोधनांची माहिती सादर करणारे तंत्रज्ञान केंद्र देखील उभारण्यात येणार आहे,”केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी सांगितले.
महोत्सव अधिक सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी प्रवेश-योग्य बनावा म्हणून, दिव्यांगजनांसाठी चित्रपट प्रदर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे,असे ठाकूर म्हणाले. “दिव्यांगजनांच्या प्रवेश-योग्यतेच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन, या विभागातले चित्रपट संवाद वर्णन आणि उप-शीर्षकांसह ऑडिओ-व्हिज्युअल-सुसज्ज असतील. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (FTII) दिव्यांगजनांसाठी दोन विशेष अभ्यासक्रम आयोजित करणार असून, यामध्ये ‘स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ (ऑटिस्टिक व्यक्तींसाठी) आणि ‘पडद्यावरील अभिनय’ (व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी) या अभ्यासक्रमांचा समावेश असेल.” असेही ते पुढे म्हणाले.
Related Posts
-
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हॉकी विश्वचषक ट्रॉफीचे राजधानीत अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - FIH ओदिशा हॉकी…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
यवतमाळ अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन
प्रतिनिधी . यवतमाळ, दि. २३ - पुजा करतांना देवासमोर लावण्यात…
-
ओटीटी प्लॅटफॉर्म वर अश्लीलता आणि असभ्य भाषेच्या वाढत्या वापराबद्दल सरकार गंभीर- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नागपूर/प्रतिनिधी - ओटीटी प्लॅटफॉर्म वर दाखवल्या…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यात सागरी युद्ध सराव
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदल आणि रॉयल…
-
ड्रोनवरील अनुभूती केंद्र' या प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - नवोन्मेषाला चालना आणि…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
दुबईत‘प्रसारमाध्यम आणि मनोरंजन सप्ताहाचे’ उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - माहिती आणि प्रसारण…
-
२४ तास अखंड वीजपुरवठ्यासाठी केंद्र सरकार ६० टक्के अनुदान देणार-मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील…
-
भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आणि मलेशियाच्या…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
जनता उपाशी आणि नेते मात्र तुपाशी - काकासाहेब कुलकर्णी
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
विद्यापीठ लॅब,विविध रोग चाचण्यांसाठी कायमस्वरूपी यंत्रणा - महिला व बालविकास मंत्री ऍड.यशोमती ठाकूर
प्रतिनिधी. अमरावती - कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन अत्यंत कमी काळात…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
केंद्र सरकारने माकड चाळे थांबवावेत - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/aC8Y1-4_z0Q कोल्हापूर / प्रतिनिधी - कांद्याच्या…
-
नरेंद्र मोदींनी भारत कधीच जोडलाय तुम्ही आधी तुमची पार्टी जोडा - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी -महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी नंतर…
-
जगात क्रीडा क्षेत्रातील अव्वल १० देशांमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यासाठी ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया - अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केवडिया - केंद्रीय युवा व्यवहार आणि…
-
भारतीय नौदलाचा तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन परिसंवाद संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या…
-
ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे पंतप्रधान यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे आणि दिवा दरम्यानच्या…
-
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडियाच्या ‘डॅशबोर्ड’चे केले अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा व्यवहार…
-
मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांना सर्वाधिक धोका प्रमुख वृत्त वाहिन्यांपासूनच - अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
तापी आणि पूर्णा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - तापी व…
-
ऑस्कर पुरस्कारप्राप्त एलिफंट व्हिस्परर्सच्या टीमची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसैनिकांचा जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
बातम्यांच्या प्रसारणात वेगापेक्षा अचूकता महत्त्वाची - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - "विश्वसनीय बातमी सादर…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते समुदाय रेडिओ पुरस्कारांचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या पोर्टलचा प्रांरभ
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय क्रीडा दिन…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
रोग निदान आणि उपचारासाठी नवपद्धती ‘जिमोनिक्स, झेब्राफिश
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - रोग निदान व उपचारासाठी जिनोमिक्स,…
-
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना…
-
सीएसआयआर-एनआयओ आणि बिट्स पिलानी यांच्यात शैक्षणिक करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था…
-
एकत्र सरकारमध्ये राहायचं आणि वेगळं वागायचं अस आमचं धोरण नाही- मंत्री जयंत पाटील
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- येत्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास…
-
मुंबईत एनएफडीसी आणि अर्जेंटिना चित्रपट महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.मुंबई/प्रतिनिधी - भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते "चल मन वृंदावन" कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - केंद्रीय माहिती…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
डोंबिवलीत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आले आमने सामने
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
-
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते तक्षशिला क्रीडा संकुलाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील…
-
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
भारतीय केळी आणि बेबीकॉर्न कॅनडाच्या बाजारपेठेत विक्रीला जाणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतात उत्पादित केळी आणि…