प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण ग्रामीण मधील आडीवली ढोकळी परिसरात एका गोदामात केमिकल्स च्या सहाय्याने बनावट डिझेल बनवले जात असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांच ला मिळाली होती .या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम च्या पथकाने आडीवली येथे छापा टाकला .या छाप्या दरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले या ठिकाणी बनावट डिझेल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. या ठिकाणी काम करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले असून एक टेंपो व ट्रकसह अकरा हजार लिटर डिझेल साठा जप्त केला .या पाच ही आरोपीना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे .या प्रकरणात मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे डिझेल कुणाला विकले जात होते ,केमिकल कुठून आणले जात होते याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे
या प्रकरणी पवन यादव, कृष्णा शुक्ला, रोहन शेलार, पंकज सिंग, विपूल वाघमारे या पाच जणंना अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास ३० लाख रुपये किंमतीचे बनावटी डिझेंल जप्त करण्यात आले आहे. गँगचा म्होरक्या जो हा धंदा चालवित होता संदीप राणे याच्या शोधात पोलिस पथक रवाना झाले आहे.
या प्रकरणी तपास अधिकारी भूषण दायमा यांनी सांगितले की, या पाचही आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले असता त्यांना २१ तारखे पर्यंत र्पोलिस कोठडी सुनावली आहे. म्होरक्याच्या आम्ही शोधात आहे. कोण या गँगकडून बनावट डिझेंल घेत होता. त्याचाही तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान डिझेल च्या किंमती गगनाला भिडल्याने ३० ते ४० रुपयात मिळणारे बनावट डिझेल विविध ट्रान्सपोर्ट साठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचा अंदाज पोलिसांव्दारे वर्तवण्यात येत आहे .
Related Posts