नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 20 मे हा मतदानाचा दिवस श्रीकांत शिंदे यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या त्यांना काट्याची टक्कर देत असल्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळेच आता कल्याण, डोंबिवली बरोबरच अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे श्रीकांत शिंदे आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना येथील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्यात उत्साह संचारल्याचे दिसत आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले “लोकांची ही गर्दीबघून महायुतीचा विजय पक्का आहे असं मला वाटतं. प्रत्येक नागरिक हा घरातून बाहेर पडून या रॅलीत सहभागी झाले. लोकं आमच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. डोंबिवलीमधून महायुतीला 90% टक्क्यापेक्षा जास्त मतदान होईल. कारण लोकांची ही गर्दी आम्हाला सांगतेय कि चिंता करू नका यावेळी सुद्धा विजय हा महायुतीचाच होणार.”