नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – महाराष्ट्र दिना निमित बीकेसी मैदाना मध्ये आयोजित करण्यात आलेल्या, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला ठाणे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे १० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर समन्वयक तथा, ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.
-येत्या एक मे ‘ महाराष्ट्र दिना ‘ निमित्त मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) , तसेच काँग्रेस पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.ठाणे शहरातून सुमारे १९७ बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या असून, ठाणे शहरातील चारही विधानसभा मतदार संघामधील सुमारे १० हजार कार्यकर्ते या सभेला जाणार आहेत. दुपारी 3 वाजताच्या सुमारास सर्व बसगाड्या मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत, असे आनंद परांजपे यांनी सांगितले.
दरम्यान, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, मुरबाड, शहापूर , अंबरनाथ, बदलापूर येथूनही साधारणपणे १५ ते २० हजार कार्यकर्ते वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार आहेत, असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.