नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड/प्रतिनिधी – काही दिवसांपूर्वी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. 17 पैकी 17 संचालक हे महाविकास आघाडीचे निवडून आले होते. त्याकरिता आज सभापती व उपसभापती यांची निवड प्रक्रिया पार पडली, यामध्ये काँग्रेसचे संजय लहानकर यांना सभापतीपद तर शिवसेनेचे भुजंग पाटील यांना उपसभापतीपद देण्यात आले.
अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चे पॅनल तयार करण्यात आले होते. त्यामुळे हा प्रयोग महाराष्ट्रात देखील होण्याची शक्यता वर्तवल्या जाते सभापती व उपसभापती यांनी सर्व मतदार बंधूंचे व तसेच सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले. यावेळी निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर गुलालाची उधळण करत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.
Related Posts
युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? ॲड. प्रकाश आंबेडकर