कल्याण/ प्रतिनिधी –कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील पाहीजे असलेला आरोपी रहमत युसुफ पठाण यास सापळा लावुन अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून २७.४०५ किलो ग्रॅम वजनाचा ४ लाख ५ हजार किंमतीचा गांजा हस्तगत केला आहे.
आरोपी पठाण याला राहत्या घरातून २४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. अनेक दिवसापासून पोलीस पठान याच्या मागावर होते, पठाण हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती एका गुप्तचराकडून पोलिसाना मिळाली. पठाण याच्या राहत्या घराजवळ सापळा रचत मोठ्या शितापीने त्याला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्या घराची झाडझाडती घेतल्यानंतर घरामध्ये एकुण २७.४०५ किलोग्रॅम वजानाचा ४ लाख किमतीचा गांजा (अंमलीपदार्थ) हस्तगत करण्यात आला आहे.
पठाण याच्या विरोधात महाताम फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्याण न्यायालयात हजार करण्यात आले होते. न्यायालयाने शुक्रवार ३० एप्रिल पर्यन्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्याची २९ एप्रिल रोजी कोव्हीड – १९ अॅन्टीजेन चाचणी पॉझीटीव्ह आल्या गुरुवारी २९ एप्रिल रोजी त्यास पुढील उपचाराकरीता सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर आरोपी औषधोपचार करून आल्यानंतर महात्मा फुले पोलिस ठाण्याकडुन ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.
सदरची कारवाई हि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, वपोनि नारायण बानकर, पो.नि.(गुन्हे) संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक सरोदे, सपोनि प्रकाश पाटील, पोहवा भालेराव, निकाळे, पोना भोईर, भालेराव, चौधरी, ठिकेकर, जाधव, पोशि हासे, मधाळे, मपोना गरूड यांनी केली आहे.