नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रामबाग लेन नं. १ येथे राहणारा २७ वर्षीय अट्टल गुन्हेगार कृष्णा दशरथ कांगणे याच्यावर महात्मा फुले चौक पोलिसांनी १ वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
कृष्णा याच्यावर खुनाचा प्रयत्न, साध्या व गंभीर दुखापती करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन गर्दी, मारामारी, दमदाटी व शिवीगाळ करुन मारहाण करणे, विनयभंग करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, नुकसान करणे असे शरीरा विरुध्द् गंभीर स्वरूपाचे ६ गुन्हे महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये व बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे १ गुन्हा असे एकुण ०७ गुन्हे दाखल होते. या इसमाने कल्याण (प.) परिसरातत प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्यामुळे तो सार्वजनिक शांततेस धोकादायक झाला होता.
म्हणुन त्याच्या विरूध्द् एम.पी. डी. ए. कायदा १९८१ (सुधारीत १९९६) अन्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्याकरीता ठाणे शहर पोलीस आयुक्त यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुर होवुन धोकादायक गुन्हेगार कृष्णा कांगणे याला १ वर्षे स्थानबध्दतेचे आदेश झाल्याने त्याला १६ मार्च रोजी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे १ वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आले आहे.
अशा प्रकारचे धोकादायक व सक्रीय गुन्हेगार यांची महात्मा फुले चौक पो. ठाणे यांनी यादी तयार केली असुन नजीकच्या काळात आणखी अशाप्रकारे सक्रीय असणाऱ्या गुन्हेगारांवर जास्तीत जास्त कडक प्रतिबंधक कारवाई करून एम.पी. डी. ए. कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये हद्दपार करण्यात येणार असल्याची माहिती व.पो.नि. अशोक होनमाने यांनी दिली.