महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे

डोंबिवली एमआयडीसी स्फोटाबाबत महाराष्ट्र सैनिकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    प्रतिनिधी.

    डोंबिवली – ०३ ॲागस्ट २०२० रोजी डोंबिवली MIDC मधील फेज ०२ मधील अंबर केमिकल कंपनीत प्रचंड मोठा स्फोट झाला. सुदैवाने रक्षाबंधनाची सुट्टी असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु आजुबाजुच्या परीसरातील सर्व इमारतींना भुकंप झाल्यासारखा स्फोटाचे हादरे आणि धक्के जाणवले.आता याबाबत कल्याण ग्रामीण मनसे अध्यक्ष मनोज घरत यांनी मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री यांना पत्र लिहीत ट्विट केले आहे.

    कल्याण ग्रामीण मनसे अध्यक्ष मनोज घरत यांनी पत्रात म्हंटले आहे की  प्रोबेस कंपनी स्फोट,मेट्रोपाॅलिटीन एक्झीमकेम कंपनीचा स्फोट व आता हा स्फोट.डोंबिवली मधील स्फोटांची ही दुर्दैवी मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यात कधी हिरवा पाऊस तर कधी गुलाबी रस्ते. जोडीला केमीकलचा उग्र दर्प तर पाचवीलाच पुजलेला.हे आम्ही डोंबिवलीकरांनी अजुन किती काळ आणि का म्हणून सहन करायचे ??? प्रोबेस स्फोटानंतर ज्या मालमत्तांचे नुकसान झाले त्या बाधीतग्रस्तांना सरकारने पंचनामे करुन आश्वासन देऊनही अद्याप त्याची नुकसानभरपाई देखील मिळालेली नाही.गुलाबी रस्त्याच्या घटने वेळी मुख्यमंत्री यांनी परीसराला भेट दिली होती. त्यानंतर धोकादायक कंपन्या हटवणार व अतिधोकादायक ०५ कंपन्या तात्काळ बंद करणार अशी आश्वासने देऊनही आजही सदरच्या कंपन्या राजरोसपणे व्यवसाय करत आहेत व डोंबिवलीकरांच्या जिवाशी खेळत आहेत.या कंपन्यांवर वचक ठेवण्याकरीता असलेल्या MIDC व MPCB या प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार करुन करून डोंबिवलीकर जनताही आता कंटाळली आहे. या दोन्ही मंडळाकडील अधिकारी वर्ग फक्त नावाला उरला असुन भ्रष्टाचारामध्ये पुर्णपणे बुडाला असल्याने डोंबिवलीकरांच्या या जिव्हाळ्याच्या विषयाकडे त्यांचे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे.

    विशेष म्हणजे मनसे कल्याण ग्रामीण अध्यक्ष यांनी आपल्या पात्रात सवाल करीत म्हंटले की डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी… डोंबिवलीचे जावई या नात्याने डोंबिवलीची हीच ओळख ठेवायची की स्फोटांची व प्रदुषणाची डोंबिवली ही नवी ओळख रुढ करायची हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन सध्या तरी तुमच्या हातात आहे.सदर विषय अतिशय गंभीर असुन डोंबिवलीचा भोपाळ होऊ नये यासाठी तुम्ही तात्काळ यात लक्ष घालुन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती सुद्धा केली आहे.

    Related Posts
      Translate »