नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली – ‘मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने वि.वा.शिरवाडकरांच्या साहित्य वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात दिल्लीतील मराठी अधिकारी आणि पत्रकार सहभागी होणार आहेत.
वि.वा.शिरवाडकरांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत, परिचय केंद्राने १४ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान त्यांच्या साहित्य वाचन उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात केंद्र व राज्य शासनातील दिल्लीत कार्यरत मराठी अधिकारी आाणि मराठी पत्रकार सहभागी होणार आहेत. वि.वा.शिरवाडकरांच्या कथा, कादंबरी, कविता आदी साहित्याचे मान्यवरांनी केलेले वाचन परिचय केंद्राच्या ट्वीटर हँडल,फेसबुक(पेज, गृप),युट्यूब चॅनेल, इन्स्टाग्राम आणि कु या समाजमाध्यमांवर संबंधित ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात येतील.
‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘कुसुमाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे मराठी साहित्यिक. कुसुमाग्रजांच्या स्मृतिला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
वि.वा शिरवाडकरांचे एकूण २४ कविता संग्रह , ३ कादंबऱ्या, १६ कथा संग्रह, १९ नाटके, ५ नाटिका व एकांकी आणि ४ लेखसंग्रह आदि साहित्य संपदा प्रसिध्द आहे. १९६४ मध्ये गोव्यात आयोजित ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये त्यांच्या ‘नटसम्राट’ ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले तर याच कलाकृतीला १९८७ मध्ये ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारही मिळाला.
कुसुमाग्रजांच्या कविता संग्रहाविषयी
कुसुमाग्रजांचे एकूण २४ कविता संग्रह प्रकाशित आहेत. यामध्ये जीवनलहरी, विशाखा, समिधा, किनारा, मेघदूत अनुवाद, मराठी माती, स्वगत, जाईचा कुंज बालांसाठी कविता, हिमरेषा, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, श्रावण, प्रवासी पक्षी, पाथेय, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज, माधवी, महावृक्ष, करार एका ताऱ्याशी, चाफा, मारवा, अक्षरबाग, थांब सहेली या काव्यसंग्रहांचा समावेश आहे.
परिचय केंद्राच्या ‘मराठी भाषा गौरव दिन उपक्रम-२०२१’ विषयी
परिचय केंद्राच्यावतीने २०२१ मध्ये ‘मराठी भाषा गौरवदिना’निमित्ताने कार्यालयाच्या सर्व समाज माध्यमांहून कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला होता .यात महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्य व परदेशातील साहित्य प्रेमींनी सहभाग घेतला होता.
राज्य शासनाच्या ‘द्वि वर्षपूर्ती’ निमित्त सद्या परिचय केंद्राची विशेष मोहीम
महाराष्ट्र शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त परिचय केंद्राच्या सर्व समाज माध्यमांहून सद्या विशेष मोहीम राबविली जात आहे. यात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित ‘दोनवर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या पुस्तिकेतील माहितीवर आधारीत ध्वनिचित्रफीत दररोज प्रसारित करण्यात येते. या मोहिमेद्वारे राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेली जनकल्याणाची कामे व राबविलेल्या जनहितकारी योजनांची माहिती देण्यात येत आहे.
Related Posts
-
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा
नवी दिल्ली प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक महोत्सवी…
-
माजी सैनिक पाल्यांच्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाबाबत आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांना…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र परिचय केंद्राला सर्वात…
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
नवी दिल्लीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त वैविद्यपूर्ण उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने…
-
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘जाणता राजा, मामाच्या…
-
मराठी भाषा पंधरवडा निमित्त परिचय केंद्राचे विविध उपक्रम
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने…
-
महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात ‘दिवाळी अंक प्रदर्शना’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठी साहित्याची परंपरा…
-
शक्ती विधेयकाला बळकटी देणारे महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक २०२० मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिला व बालकांवरील अत्याचार…
-
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने ‘आर्याबाग’ वर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठी भाषेला मिळालेली समृध्द…
-
नारीशक्ती पुरस्कार विजेत्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट
नवी दिल्ली- कथक नृत्यांगणा सायली अगावणे, सर्प मित्र वनिता बोराडे…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नॅशनल कॅडेट…
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने NITवर काढला बडग्या मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - नागपूरात आज…
-
महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिन २६…
-
रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या नांदेड…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र…
-
नवी दिल्ली राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन…
-
कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा…
-
मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात…
-
नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन साजरा
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आज महाराष्ट्र राज्य…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील…
-
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची निषेध द्वारसभा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आज विवीध संघटनेतर्फे…
-
टपाल कार्यालयांमधून राखी साठी विशेष लिफाफ्यांची विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - रक्षा बंधन हा…
-
मुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या…
-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
मुंबईत फ्लेमिंगो’पक्ष्यांवर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाच्या…
-
विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा”
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा…