नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – नागपूरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपुर सुधार प्रन्यास (NIT)वर बडग्या (पुतळा) मोर्चा काढला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोर्चात NITच्या विरोधात घोषणाबाजी केली.
सोबतच या बडग्यांवर लिहलं होत की, NITचे अधिकारी भ्रष्ट्राचारी आहे आणि बडग्याला 500 आणि 2000 च्या नोटा पण लावल्या होता. NITवर मोर्चा पोहचल्यावर मनसे नेते आणि NITचे अधिकारी मनोज सुर्यवंशी यांची बैठक झाली. जिथे मनसे नेत्यांनी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं अधिकाऱ्यांसमोर ठेवली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्वतः मनोज सुर्यवंशी या भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत व त्यांनी अनेक राजकीय लोकांना NITचे भूखंड वाटले आहेत, असा गंभीर आरोप केला आहे.