नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – आज महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करून ध्वजवंदन केले. यावेळी राष्ट्रगीत गायन झाल्यावर शासन निर्णया नुसार राज्यगीताची ध्वनिफीत वाजवण्यात आली.यासमयी महापालिकेचे उपायुक्त सुधाकर जगताप, महापालिका सचिव संजय जाधव, उपायुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव,अतुल पाटील,कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत,प्रभागांचे सहा.आयुक्त , इतर अधिकारी वर्ग, मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी भारतीय स्वातंत्र्या च्या 75 व्या जयंतीनिमित्त मा. राष्ट्रपती यांचेकडून सेवापदक बहाल करण्यात आलेल्या तसेच 9 मार्च 23 रोजी खंबाळपाडा येथील कंपनीला लागलेली भीषण आग विझविण्यासाठी उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातील नामदेव चौधरी, दामोदर वांगड व इतर अग्निशमन अधिकारी/कर्मचाऱ्यांचा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे व इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या डोंबिवली विभागातही अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या शुभहस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपायुक्त स्वाती देशपांडे, प्रभागाचे सहाय्यक आयुक्त , इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.