Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

श्री विठ्ठल-रुक्मिणीची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते महापुजा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – शहाड येथील प्रसिद्ध बिर्ला मंदिरात म्हणजेच विठ्ठल मंदिरात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज महापुजा करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीनिमित्ताने आज शहाड परिसरात विठ्ठल भक्तीचा गजर होत होता.बिर्ला कंपनीने शहाड येथे उभारलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची प्रति पंढरपूर म्हणून वारकऱ्यांकडून पसंती दिली जाते. पंढरपूरच्या यात्रेला न जाता आलेले हजारो भाविक शहाड येथील मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेतात. या मंदिराचे व्यवस्थापन बिर्ला समुहाच्या वतीने केले जात आहे.

आषाढी एकादशीनिमित्ताने आज श्री विठ्ठलाची महापुजा करण्यात आली. यंदा हा मान केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना देण्यात आला. या वेळी सेंच्युरी रेयॉन समुहातील मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश चितलांगे यांचीही उपस्थिती होती.
देशातील सर्व जनतेला निरोगी व सुखी-समाधानी आयुष्य लाभो. पुरेसा पाऊस पडून देशातील बळीराजा सुखी होवो, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी विठ्ठलाला साकडं घातले. तिसरी-चौथीत असताना वडिलांबरोबर रांगेत उभे राहून दर्शन घेतले होते. आज माझ्या हस्ते श्री विठ्ठलाची महापुजा झाल्यामुळे मी आज भाग्यवान आहे, अशी भावना श्री. पाटील यांनी व्यक्त केली. या वेळी श्री. पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X