Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
करियर ताज्या घडामोडी

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला पात्र विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीचे आर्थिक सहाय्य

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी- महात्मा ज्योतिबा संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) संस्थेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील 298 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे 1,49,00,000/- इतक्या निधीचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

सन 2023 या वर्षासाठी यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना प्रत्येकी 50,000 रु. एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येतो. दि. 12 जून2023 रोजी यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. त्यातील पात्र इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी दि.08 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 356 अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी 314 विद्यार्थी सदर योजनेचा लाभासाठी पात्र ठरले आहे. त्यातील 298 विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये एक रकमी प्रमाणे आत्तापर्यंत 1,49,00,000 रुपये इतक्या निधीचे विद्यार्थ्यांना वितरण केलेले असून उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बँक तपशील सादर केल्यावर निर्धारीत करण्यात येईल.

यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना या निधीचा लाभ या परीक्षेच्या तयारीसाठी होणार आहे, असे महाज्योतीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X