Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

कापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसान

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी – संभाजीनगर मधील सिल्लोड शहराजवळील डोंगरगाव रस्त्यावर असलेल्या कापूस जिनिंगला बुधवारी रात्रीच्या सुमारास आग (Fire) लागली. सिल्लोड (Sillod) शहर हद्दीत व शहरालगत १५ ते २० कापूस जिनिंग आहेत. जिनिंग मधील कापसाने अचानक पेट घेतला व या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आग विझविण्यासाठी तात्काळ नगरपरिषद प्रशासनाचा बंब दाखल झाला. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत मोठे नुकसान झाल्याने परिणामी हजारो क्विंटल कापूस जळाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्याने मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेच्या ठिकाणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्याचे काम सुरू होते नेमका किती कापूस जळून किती रुपयांचे नुकसान झाले? त्याचा अंदाज सध्या सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Translate »
X