नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्व येथील लोकग्राम पुलाचा भूमिपूजन सोहळा शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला.त्याच बरोबर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या आणि कल्याण रेल्वे स्थानकातून नियमितरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा पादचारी पुल आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून हा पुल उभा केला जात आहे येत्या मार्च २०२४ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती या भूमिपूजन सोहळ्या दरम्यान देण्यात आली. मात्र या भूमिपूजन सोहळ्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत सत्ताधार्याना टोला लगावला आहे.
ते ट्विट करत म्हणतात की,गेली अनेक वर्ष रखडलेल्या कल्याण रेल्वे स्थानक येथील लोकग्राम पादचारी पुलाचे आज पुन्हा एकदा जोरात भुमीपुजन झाले.खरंतर जानेवारीत हे काम चालू झाले आहे,परंतु कामाची गती अगदीच मंद आहे. माझी चमकेश सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की पाहिजे तर दर आठवड्याला प्रत्येक खांबाचे भूमीपुजन करा पण हा पुल लवकरात लवकर लोकांच्या सोयीसाठी तयार कसा होईल ते पहा . तुम्हाला पुढील भूमीपुजनासाठी मनसे शुभेच्छा !