प्रतिनिधी .
कल्याण – कल्याण डोंबिवली शहरातील कोरोना रुग्णाचा आकडा दिवस दिवस वाढत असून नागरिकाच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्यास हातभार लागत असल्यामुळेच जिल्हाधिकार्याच्या निर्देशां प्रमाणे पालिका आयुक्तांनी शहरात २ जुलै पासून लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र शहरात मिळणारे कोरोना रुग्ण आणि त्याचा होत असलेला प्रसार पाहता शहरात आणखी ७ दिवसाचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. रविवार सकाळी ७ वाजल्या पासून रविवार १९ जुलै च्या संध्याकाळ पर्यत शहरात लॉकडाऊन कायम राहणार असून लॉकडाऊन साठी घालून दिलेले नियम तसेच राहणार असल्याचेहि आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.तसेच नागरिकांनी लोकडाऊन काळात नागरिकांनी सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे
Related Posts