प्रतिनिधी .
कल्याण – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दिवसन दिवस संसर्ग वाढत आहे. जो तो आप आपल्या परीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून प्रयत्न करत आहे. प्रशासन आपल्या परीने होईल त्या उपाय योजना करत आहे सर्व जन वेग वेगळ्या पातळीवर कोरोनाशी दोन हात करत आहे. या कोरोनाच्या लढाईत सर्वात महत्वाची कामगिरी बजावत आहेत, ते म्हणजे कोरोना योद्धा. पोलीस ,डॉक्टर ,नर्सेस ,आरोग्य कर्मचारी.सफाई कामगार, पत्रकार,एम ए सी बी कर्मचारी ,बेस्टचे कर्मचारी एस टी कर्मचारी असेअनेक कोरोना योद्धा आपल्या जीवाची पर्वा न, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता चोवीस चोवीस तास आपली सेवा प्रामाणिक पणे आपली सेवा बजावत आहे.हि सेवा बजावत आसताना कोरोना चा संसर्ग होण्याची भीती सर्वात जास्त या कोरोना योद्धा ना आहे आपणही या योद्धा ची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हे कोरोना योद्धा म्हणून अहो रात्र काम करत आहे. त्यांची काळजी घेन्या करीता, पोलीस बाधवाना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून न्यु हिंदुस्थान कामगार सेना यांच्या वतीने संपुर्ण खडकपाडा पोलीस स्टेशनचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. आपण जर या कोरोना योद्धाची काळजी घेतली तरच आपण कोरोनाची हि लढाई जिंकू शकतो. या प्रसंगी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष ( अनुसुचीत जाती विभाग ) मा. नगरसेवक सुरेंन्द्र आढाव तसेचे न्यु हिंदुस्थान कामगार सेनेचे महाराष्ट्र सचिव भास्कर नायडु व खडक पाडा पोलीस स्टेशन चे ठाणा अंमलदार कदम साहेब व गोपनीयचे सानप साहेब हे देखील उपस्थीत होते या कार्याला पोलीसांनी सदिच्छा दिले सुरेंन्द्र आढाव*यांनी आभार व्यक्त केले