मुंबई/प्रतिनिधी – आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
कोरोनासाठीचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा, या प्रत्यक्ष तर शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, संचालक राहुल त्रिवेदी, टास्क फोर्स सदस्य डॉ.सुहास प्रभू, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) चे विकास गरड ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत. तेव्हा मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत. सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या-पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. मुलं ही फुलासारखी नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमित चर्चा होत असते.
शाळा सुरु करताना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीत, हवा खेळती असावी, शाळेचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करताना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याचीदेखील काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. पावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. स्वःताला बरे वाटत नसेल तर शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
आजपासून शाळा सुरु होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला जाणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधने यानुसार गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
शालेय शिक्षणमंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरु करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविड -१९ ची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरु करू शकलो नाही.
आज जरी ग्रामीण आणि शहरी भागातील काही शाळा आपण सुरु करीत असलो तरी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन,ऑफलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ करीत आहोत. विद्यार्थीनिहाय शैक्षणिक गरजा, उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांचे मूलभूत कौशल्य व अध्ययन निष्पतीचे सर्वेक्षण करून शाळास्तरावर निश्चित व सातत्यपूर्ण आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, साहित्य, पालक सहभाग, मूल्यमापन, अभ्यासेतर नियोजन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा, शारीरिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठीचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
मार्च २०२० पासून कोविड-१९ ची संसर्गता लक्षात आल्याने लॉक डाऊनमुळे शाळा तडकाफडकी बंद कराव्या लागल्यात. पण आपला शिक्षण विभाग मात्र निरंतर विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून निरंतर कार्यरत राहिला आहे. याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी मागील १८ महिन्यात ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने अत्यंत परिणामकारक उपक्रम राबवले आहेत. रेडिओ, दूरदर्शन, व्हॉटसअप, युटुयब, फेसबुक, गुगल क्लासरूम या सर्व माध्यमाचा प्रभावी वापर करीत मुलांना त्यांच्या इयात्तानुरूप शिकत ठेवले आहे, असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.
‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ हा शासनाचा उपक्रम स्तुत्य असून विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स ने सुचविलेल्या सूचनांचे पालन करून शाळा सुरु होत आहेत, याबद्दल आनंद व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे चक्र सुरु रहावे अशी भावना टास्क फोर्सचे सदस्य आणि जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ. सुहास प्रभू यांनी व्यक्त केली.
कोरोना कालावधीत जी मुलं शाळाबाह्य झाली असतील त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज डॉ. प्रभू यांनी व्यक्त केली. पालक आणि शिक्षक यांनी सातत्याने संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.
शालेय शिक्षण विभागातर्फे शाळा सुरु होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा यांनी माहिती दिली. पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थित असलेल्या आयुक्त विशाल सोळंकी यांनी आभार मानले. श्री विशाल गरड यांनी सूत्रसंचालन केले. शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या ध्वनीचित्रफीतीचेही यावेळी अनावरण करण्यात आले.
Related Posts
-
मंदिरं बंद पण आरोग्यमंदिरं सुरू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणे/प्रतिनिधी - कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य…
-
चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
मुंबई प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माध्यम प्रतिनिधींना ‘कोविड योद्धा’ सन्मान
प्रतिनिधी. मुंबई- कोविड-१९ च्या संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना…
-
‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या…
-
सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी
सांगली/प्रतिनिधी - जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर…
-
महा-उत्सव २०२२ चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा…
-
नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. पोलिसांच्या सूर्यप्रकाशा इतक्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी- तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून…
-
केमिकल कंपन्यांनी सुरक्षा उपकरणं लावा अन्यथा टाळे ठोका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा
केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद
प्रतिनिधी. मुंबई- जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते,…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
औरंगाबाद/प्रतिनिधी - येथील जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम अद्ययावत, गुणवत्तापूर्ण आणि…
-
शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा - ऍड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंडस्ट्रीयल कॉन्क्लेव्ह २०२१ चे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्ये, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
लॉकडाऊन शिथिल करताना विविध क्षेत्रांना गती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रतिनिधी . मुंबई दि. २४: संकटाच्या काळात राजकारण न करता…
-
नाशिक मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - येत्या २२ जानेवारी…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर/ प्रतिनिधी - पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात,…
-
बीकेसी येथे कोविड१९ रुग्णालयाच्या कामाची मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची पाहणी
मुंबई - कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या…
-
उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे फडकवत आमदार अपात्रता निकालाचा केला निषेध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - आमदार अपात्रता प्रकरणाचा…
-
निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल-नारायण राणे
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - देशभरात लोकसभा निवडणुकीची…
-
राज्यातील इतर शाळा १५ जून पासून तर विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या…
-
डोंबिवलीत १३ मे रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा…
-
दी धारावी मॉडेल पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी – कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले…
-
महाराष्ट्र समृद्धी महामार्गदेशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रतिनिधी. अमरावती- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील…
-
चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न…
-
१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू,या असणार मार्गदर्शक सूचना
मुंबई/प्रतिनिधी - येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास…
-
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे निधन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रध्दांजली
मुंबई/प्रतिनिधी - ज्येष्ठ पत्रकार, नाटककार,साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक जयंत पवार यांच्या…
-
कल्याण मध्ये मनसेला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा; प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती
प्रतिनिधी. मुंबई दि. ७ - देशात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर राज्य सरकारने…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी घेतली भेट
नवी दिल्ली - आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत…
-
लोकांना परिवर्तन हवं असल्याने लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पसंती देणार - अनिल देसाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण देशभरात लोकसभा…
-
कोरोना रोखण्यासाठी पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा,स्विमिंग पुल तूर्तास बंद राज्य सरकारचा निर्णय
मुंबई -: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे…
-
कोविड वाढता प्रसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई– “कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे…
-
कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधानमंत्र्यांना पत्र
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी…
-
कोरोना प्रतिबंधासाठी पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद
पुणे प्रतिनिधी- पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची…
-
मुख्यमंत्री यांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीस राज ठाकरे यांची उपस्थिती
प्रतिनिधी. मुंबई - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,…
-
डोंबिवली ही सासुरवाडीआहे, सांभाळायाला हवी, आ. राजू पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / संघर्ष गांगुर्डे - एकीकडे…
-
मोदी सरकारने सांगावे किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, हे सरकार नुसतं स्वत:चा गाजावाजा करतं - उद्धव ठाकरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - संपूर्ण देशासह महाराष्ट्र…
-
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे…
-
राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच…