नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण टिटवाळा दरम्यान असलेल्या वरप गावांमधील टाटा कंपनीमध्ये काल रात्री एक ते दीडच्या सुमारास बिबट्याचा वावर असल्याचं सीसीटीव्हीत दिसून आले. याबाबत कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून वन विभाग अधिकाऱ्याला माहिती देण्यात आली असून सध्या वन विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा शोध सुरू केला आहे.
मात्र रात्रीच्या वेळेला बंद असलेल्या कंपनीत बिबट्या आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन वन विभाग अधिकाऱ्यांनी केले आहे.