महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image महाराष्ट्र मुख्य बातम्या

मोहोळ तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रीय

सोलापूर/अशोक कांबळे – मोहोळ तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रिय झाला असून भोयरे गावच्या हद्दीतीतील सीना नदीवर असलेल्या घाटणे बँरेज जवळ असलेल्या गोरख बापू जाधव यांच्या वस्तीवरील जनावरांवर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हल्ला केला आहे.या हल्ल्यात म्हशींचे पिल्लू/रेडकू मृत्युमुखी पडले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अनगर गावच्या परिसरात बिबट्या दिसल्याचे काही नागरिकांनी सांगितले होते.गेल्या वर्षभरापासून बिबट्या मोहोळ तालुक्यात धुमाकूळ घालत असून त्याने तालुक्यातील अनेक जनावरांचा फडशा पाडला होता.त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गायब झाला होता.बिबट्याला पकडण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी पिंजरे लावले होते.पण बिबट्या पिजऱ्यात काही अडकत नव्हता.त्यानंतर मोहोळ तालुक्यातून पलायन केले होते.काही दिवसांपासून गायब असलेल्या बिबट्याने करमाळा तालुक्यात सक्रिय होत मनुष्य हानी केली होती.बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने शर्तीचे प्रयत्न करून करमाळा तालुक्यात बिबट्याला गोळ्या घालून ठार केले होते.
भोयरे गावच्या हद्दीत बुधवारी रात्री जोराचा पाऊस होता.त्यामुळे जनावरे वस्तीवरील अंगणात तशीच होती.पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने जनावरांवर हल्ला केल्याने सैरावैरा झाली.या जनावरांच्या कळपातील एका म्हशीबरोबर बराच वेळ बिबट्याची झटापट झाली. यावेळी जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने गोरख पवार जागे झाले.त्यावेळी बिबट्या म्हशीच्या रेडकाला खात असल्याचे दिसले.त्यावेळी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला.भोयरे गावात रेडकावर हल्ला केलेला प्राणी बिबट्या आहे असे वन्य प्राण्यांच्या ठशावरून दिसत आहे.त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये.योग्य ती काळजी घ्यावी.रात्रीच्या वेळी रानात जात असताना बँटरी,काठी याचा उपयोग करावा.समूहाने रानात जावे.वन विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.सचिन कांबळे वन संरक्षक अधिकारी मोहोळ यांनी सागितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×