नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – सध्या देशात व राज्यात असलेली राजकीय परिस्थिती पाहता विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात सध्या जी २० च्या बैठकीमुळे रस्त्यांची वाहतूक कोंडी करून वाहनांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा पडदे लावले गेले आहेत ह्यावर भाष्य करताना दानवे म्हणाले, अनेक ठिकाणी लोकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी पडदे लावले आहेत. आपली खरी स्थिती जगासमोर आली पाहिजे. वारेमाफ जनतेच्या पैशांची उधळपट्टी चालू आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अपुऱ्या पावसाभावी कोरड्या दुष्काळाचा सामना सामना करावा लागत आहे. टँकरने पाणी पुरवणं चालू आहेत. सध्या सरकार फक्त शो बाजी मध्ये व्यस्त आहे. आता कितीही पाऊस आला तरी पूर्ण पिक हातात येणार नाही. पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना पूर्ण मिळत नाही.फक्त दही हंडी फोडून चालत नाही
जालना जिल्ह्यात सुरु असलेले मराठा समाज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जो लाठीचार्ज झाला त्या अन्यायाविरोधी वक्तव्य करताना दानवे म्हणाले कि,हे सरकार मराठा आरक्षणासंबंधी संवेदनशील नाहीच आहे. केंद्र सरकारने आता अधिवेशनात प्रस्ताव आणला पाहिजे.मला वाटतं हे सरकार मराठ्यांना न्याय देऊ शकत नाही.
सह्याद्रीवर बैठका होत असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षांना निमंत्रण देऊन आम्ही सर्व मिळून निर्णय घेत होतो. सरकार नव्या पद्धती तयार करु पाहतंय. इंडिया अलायन्स च्या बैठकीच्या निमंत्रणावरून कोणाला कसे बोलावले आणि कोणाला का नाही बोलावलं हे आम्हाला प्रश्न आहेत असे ते म्हणाले.
राजस्थानच्या सीएम बाबत दानवे म्हणाले,चांगली गोष्ट आहे त्यांच्या , पक्षांमध्ये राजस्थान मधील काही लोक पक्ष प्रवेश करत असतील तर त्यांनी येणाऱ्या काळामध्ये मणिपूरमध्ये सुद्धा शाखा चालू केली पाहिजे. शिष्टमंडळाव्यतिरिक्त उर्वरित लोक यबैठकीत कसे होते?
अजित पवार यांच्या दौऱ्यावर दानवे म्हणाले ,राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना असे दौरे करण्यात येत आहेतअजित पवार यांना शेतकऱ्यांच्या समस्या माहित आहेत तरी, अजित दादांसारखं नेतृत्व असे वागतात हे दुर्देवी आहे
उद्धव ठाकरे यांची जळगाव येथे सभा होणार आहे. या ठिकाणी आमची सत्ता असताना प्रशासनामार्फत अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मुख्यमंत्र्याच्या हस्ते कार्यक्रम व्हावा असा प्रयत्न चालू आहे प्रशासकांकडून उद्धव ठाकरे यांच्या, उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण विरोध करत आहे.मात्र आम्ही सरकारला इशारा देत आहोत आम्ही सत्तेत येऊ तेव्हा तुम्ही आम्हाला काही बोलायचं नाही. असे दानवे म्हणाले.