महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image आरोग्य लोकप्रिय बातम्या

आयएमए कल्याणच्या वतीने महिला दिनानिमित्त माय हिमोग्लोबिन डायरी या सामाजिक उपक्रमाची सुरुवात

कल्याण प्रतिनिधी – आपल्या समाजोपयोगी कार्यातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणने यंदाच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या प्रमूख उपस्थितीत कल्याणातील आयएमए हॉलमध्ये हा छोटेखानी सोहळा संपन्न झाला. तसेच या सोहळ्यात कोवीड काळात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या विविध महिलांचाही गौरव करण्यात आला.
भारतातील स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने ऍनिमिया हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. हा आजार दूर करून स्वतःच्या आरोग्याबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘माय हिमोग्लोबिन डायरी’ हा पथदर्शी उपक्रम सुरू केला. त्यासाठी आयएमए कल्याणने ऍनिमिया आजार असणाऱ्या 25 गरजू महिलांची निवड करत त्यांच्यावरील संपूर्ण उपचाराचा खर्च उचलला आहे. पुढील 3 महिने या महिलांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यक पातळीवर पोहचत नाही तोपर्यंत तज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले जाणार असल्याची माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.
तर कोवीड काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या कार्यक्रमात कल्याण डोंबिवलीच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली, डॉ. सुहासिनी बडेकर, डॉ. प्रज्ञा टिके यांच्यासह अनेक खासगी डॉक्टरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सेक्रेटरी डॉ. ईशा पानसरे, डॉ. सुरेखा इटकर, डॉ. सोनाली पाटील यांच्यासह अनेक महिला डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते

Translate »
×