Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
देश पर्यावरण

हवामान आणि पर्यावरण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत-जपान निधीचा प्रारंभ

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली /प्रतिनिधी – राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीने  (एनआयआयएफ ) अँकर  गुंतवणूकदार म्हणून भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीच्या  जपान बँक (जेबीआयसी ) सोबत $600 दशलक्ष भारत-जपान निधीचा (आयजेएफ ) प्रारंभ  केला आहे. सामायिक प्राधान्य असलेल्या  उदा. हवामान आणि पर्यावरण या क्षेत्रात उभय  देशांमधील सहकार्याचा एक महत्त्वाचा पैलू हा संयुक्त उपक्रम दर्शवतो.

ही घोषणा एनआयआयएफच्या पहिल्या द्वि-पक्षीय निधीला चिन्हांकित  करते, यामध्ये  भारत सरकारचे   लक्ष्यीत  निधीमध्ये  49%  आणि उर्वरित 51% योगदान जेबीआयसी द्वारे देण्यात येत आहे. हा निधी (एनआयआयएफ )लिमिटेडच्या माध्यमातून  (एनआयायएफएल )  व्यवस्थापित केला जाईल आणि जेबीआयसी आयजी  (जेबीआयसी  ची उपकंपनी) एनआयायएफएल ला भारतात जपानी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मदत करेल.

भारत-जपान निधी  पर्यावरणीय शाश्वतता आणि कमी कार्बन उत्सर्जन धोरणांमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि भारतातील जपानी गुंतवणूक आणखी वाढवण्यासाठी ‘पसंतीचे भागीदार’ म्हणून भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट ठेवेल.
भारत- जपान निधीची स्थापना ही जपान सरकार आणि भारत सरकार यांच्यातील धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X