नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नागपूर/ प्रतिनिधी – श्री रामांचे रामायन आपण लहान पनापासून टीव्ही वर पाहत आलोय तसेच आजीच्या गोष्टींमध्ये ऐकत आलेलो आहोत. या ग्रंथाचे महत्व भारतीयांमध्ये फार आहे. श्री रामांवर असंख्य लोकांची श्रद्धा आहे. पण काही लोक श्रद्धेच्या पुढे जाऊन देवासाठी असणारी आपली निष्ठा वेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असतात. काही जन देवाची पूजा करतात, तर काही जन जप करतात पण जेव्हा गोष्ट कलाकाराची येते तेव्हा काही वेगळे नजरेस पडल्याशिवाय राहत नाही. कारण कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून देवाविषयी असलेली आपली श्रद्धा दाखवतात.
रामायणाच्या थीमवर सर्वात मोठी ‘टायपोग्राफिक पेंटिंग’ नागपूर शहरातील कीर्ती अग्रवाल यांनी तयार केली आहे. हे पेंटिंग ’60 इंच रुंद आणि 30 इंच उंचीचे आहे. रामायणाची ही पेंटिंग इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने 2025 च्या रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्याची पुष्टी केली आहे. यासंदर्भात कीर्ती यांनी सांगितले की, त्यांना आधीपासून लिहण्याची आवड होती.
कीर्ती अग्रवाल यांनी टायपोग्राफिक मध्ये काढलेली चित्रे पाहिली आणि त्यानंतर त्यांनी छोटी चित्रे काढायला सुरुवात केली. आपल्या घरातील जबाबदारी संभाळून त्या आपला हा छंद जोपासत आहेत. या मध्ये त्यांनी आपल्या या कलेतून अनेक चित्रे काढली आहेत. या मध्ये त्यांची विषेश पेंटिंग ही रामायणाच्या थिमवरील आधारीत असलेली सर्वात मोठी पेंटिंग आहे. या पेंटिंगच्या निर्मितीची सुरुवात त्यांनी 2022 मध्ये केली होती. आता ही पेंटिंग पुर्ण झाली आहे. जेल, बॉल पॉइंट आणि ग्लिटर पेन वापरून रामायणाची पेंटिंग तयार करण्यात आली आहे. या पेंटिंगमध्ये हिंदीत श्री रामाचे नाव लिहून तयार करण्यात आले आहे. या पेंटिंगची पडताळणी करून त्याची पुष्टी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड संपादकीय मंडळाने केली आहे. या सोबतच किर्ती अग्रवाल या जेव्हा अयोध्येत राम मंदिर दर्शनास जातील, त्यावेळी ही पेंटिंग अयोध्येतील राम मंदिरात देणार असल्याचे कीर्ती अग्रवाल म्हणाल्या आहेत.