महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

लालूप्रसाद यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – २०१४ पासून देशामध्ये असलेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला असता देशात एकहाती सत्तेची सूत्रे बदलणे गरजेचे आहे. यासाठी राजकीय पक्ष एकत्र येवून संघटन होणे गरजेचे होते. ह्यातूनच सर्वपक्षीय संघटन झाले असून इंडिया आघाडीची ३१ ऑगस्ट व १ सप्टेबर रोजी मुंबईत बैठक आयोजित केली आहे. ह्या बैठकीसाठी देशातील दिग्गज नेते मुंबईत यायला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत पोहोचले आहेत. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री बाबा सिद्दिकी, शिवसेना आ. सचिन अहिर, यांनी त्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×