नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – आज दीक्षाभूमीवर महामानव डॉ. बाबाबासाहेब आंडेकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी सकाळपासून दीक्षाभूमीवर पोहोचले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो बौद्ध अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्याचं दिवसाचे स्मरण करत अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी आज दीक्षाभूमी येथे येत असतात. महामानवाला अभिवादन करत असतात. मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी हे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने पोहचलेले आहेत. संपूर्ण दीक्षाभूमीचा परिसर पंचशील ध्वजाने नाहून निघालेला आहे.