नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात 60 गावांमध्ये स्मशानभूमी नाही त्या मध्ये सर्वात जास्त गाव मुक्ताईनगर तालुक्यात आहेत. साठ ठिकाणी स्मशानभूमी नाही त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं आहे या ठिकाणी लवकरात लवकर स्मशानभूमी करणार तसेच ज्या गावांमध्ये स्मशान भूमी आहे. परंतु रस्ते व लाईट नाही त्या ठिकाणी देखील सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहोत असे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जळगाव जिल्हा अधिकारी ह्यांनी चोपडा तालुक्यात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आढावा बैठक घेतली त्या आधी त्यांनी माचला या गावी जाऊन निवडणूक कामे गृहभेट घेतली व मतदान नोंदणी संदर्भात सूचना व विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी , तहसीलदार व अप्पर तहसीलदार आधी उपस्थित होते.
पी एम किसान योजनेत चोपडा तालुक्याचे सर्वात जास्त लक्षांक आहे तसेच महसूल विभागाचे ज्या सूचना व काम आहे त्या संदर्भात चोपडा तालुक्याचे चांगली कामगिरी आहे येणाऱ्या काळामध्ये त्याची परिचिती नागरिकांना होईल असे या वेळेस जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या वतीने हातभट्टी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 105 ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 92 जणांना अटक करण्यात आली आहे जवळपास 18 हजार रसायन नष्ट करण्यात आलेले आहे तेराशे लिटर रसायन पाकीट मधले जप्त करण्यात आला आहे हे कारवाई संपूर्ण जिल्ह्यात झालेली आहे राज्य उत्पादक शुल्क कार्यालय ई कार्यालय होणार. हातभट्टी वर फक्त कारवाई न करता जो कोणी हातभट्टीच्या धंद्यात आहे त्याला इतर व्यवसाय करण्यासाठी प्रावृत्त करण्यासाठी स्किल ट्रेनिंग चे असिस्टंट कमिशनर साहेबांना सांगितले आहे व्यसनाधीन व्यक्तींसाठी व्यसनमुक्ती साठी काम करणार असल्याचेही यावेळी सांगितले.