संघर्ष गांगुर्डे
भारतीय समाज रचनेची कायापालट करून वादळ निर्माण करणारे क्रांतीबा.भारतीय स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे क्रांतीबा. स्त्रियांचे मुक्क्तीदाते क्रांतीबा.रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिव जयंतीची सुरुवात केली. शिवजयंतीचे जनक असणारे क्रांतीबा. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना कुळवाडी भूषण म्हणून संबोधाणारे क्रांतीबा. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून शेतकऱ्यानसाठी आवाज उठविला ते क्रांतीबा. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी लढा उभारला ते क्रांतीबा. त्या लढ्यात स्वतःला झोकुन दिले ते क्रांतीबा. शिक्षण फक्त समाजातील एका वर्गासाठी नसून ते सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारे क्रांतीबा.
सामाजिक समतेचा संदेश देणारे क्रांतीबा. शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरे स्वतंत्र मिळवून देणारे क्रांतीबा.अशा या महान समाजसुधारक समतेचा संदेश देणारे क्रांतिसूर्य क्रांतीबा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त नेशन न्युज मराठी टीम कडून विनम्र अभिवादन.