मुंबई/प्रतिनिधी – कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करताना बोलत होते.केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या लाटेच्या शेवटी सणवार आले होते पण आता दुसरी लाट ओसरता ओसरता सण-उत्सवांची सुरुवात होते आहे. त्यात आपण गेल्या पंधरा दिवसांपासून निर्बंध शिथिल केले आहेत, पण ही मोकळीक आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवसाय सुरु राहावेत, अर्थचक्र थांबू नये म्हणून आहे. आपल्याला संसर्ग आणि मृत्यू दर आणखी कमी करायचा आहे. त्यामुळे कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या.आज लोकार्पण होत असलेल्या कोविड काळजी केंद्राविषयी समाधान व्यक्त करून ते म्हणाले की, तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संर्गाचा धोका जास्त असल्याने राज्य शासनाने लहान मुलांसाठी कोविड टास्क फोर्स स्थापन केला असून असा टास्क फोर्स स्थापन करणारे आपले पहिले राज्य आहे. मुंबईत आधुनिक अशी जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील असेही ते म्हणाले.आज लोकार्पण करण्यात आलेले कोविड काळजी केंद्र आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले असून ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
कलिना विद्यापीठ आय.टी. पार्क येथे उभारण्यात आलेले लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र हे पाच हजार चौरस फुटांचे असून रुग्ण खाटांची संख्या 30 आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रशस्त जागा आहे. हे केंद्र कोरोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण व त्यांच्या उपचाराकरिता तयार करण्यात आले आहे. याठिकाणी स्तनदा मातांना स्तनपानाकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त मुलांसोबत पालकांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या कोरोना काळजी केंद्रात २४ तास स्वच्छता व सुरक्षिततेसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांवर महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी लहान मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजन उपक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.या केंद्रात लहान मुलांना दवाखान्यात आल्यासारखे वाटू नये व आनंददायी वातावरण असावे असा प्रयत्न करण्यात आला आहे. रंगीबेरंगी भिंती, वेगवेगळी खेळणी, कार्डबोर्डचे बेड्स, आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.या कार्यक्रमास परिवहनमंत्री अनिल परब, आमदार संजय पोतनीस, महापौर किशोरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती.
Related Posts
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला
कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे.…
-
आता वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक…
-
भिवंडीतील जिल्हा कोविड रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भिवंडी/ प्रतिनिधी- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत…
-
चेंबूर येथील निरंकारी भवनात कोविड लसीकरण केंद्र सुरु तर दादरमध्ये ८१ निरंकारी भक्तांचे रक्तदान
मुंबई /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या चेंबूर स्थित मुंबईतील मुख्य…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
केंद्र सरकारने माकड चाळे थांबवावेत - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/aC8Y1-4_z0Q कोल्हापूर / प्रतिनिधी - कांद्याच्या…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील…
-
कोरोना योद्धाची काळजी घेऊया कोरोनाला हरवूया
प्रतिनिधी . कल्याण - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दिवसन…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
डोंबिवलीत केंद्र सरकार विरोधात काँग्रसचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - वाढती महागाई आणि बेरोजगारी…
-
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद…
-
पंढरपूरात होणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल
पंढरपूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी व कोविडच्या रुग्णांना वेळेत…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी रात्रीच्या वेळी आता केडीएमसीची मध्यवर्ती वॉररुम
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रात्री - अपरात्री रुग्णांच्या नातेवाईकांची…
-
कल्याणात राज्यातील तृतीय पंथीयासाठीचे पहिले निवारा केंद्र
कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक…
-
एमटीडीसीच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
कोविड योद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना जेनेरिक आधारच्या वतीने प्रथमोपचार किट वाटप
मुंबई /प्रतिनिधी - जगात कोविड १९ ने थैमान घातले आहे.…
-
शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरच्या मान्यतेसाठी सरपंच उपोषणाच्या तयारीत
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाची…
-
कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात…
-
१४६ खासदारांच निलंबन,केंद्र सरकार विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निदर्शने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - दिल्ली येथे संसदेच्या…
-
डोंबिवली येथील कोपर पूल गणेशोत्सवापूर्वी सुरु होण्याचे संकेत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून…
-
हाफकीन मधील संसर्गजन्य रोग संशोधन केंद्र निर्मितीसाठी बैठक
मुंबई प्रतिनिधी - येथील हाफकीन इन्स्टिट्युटमध्ये संसर्गजन्य रोगाचे संशोधन केंद्र…
-
दिंडोरी तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - दिंडोरी तालुक्यातील वनी येथे…
-
केडीएमसी लवकरच सुरु करणार स्वतःची जलतपासणी प्रयोगशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दूषित पाण्यामुळे आपल्याला…
-
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना…
-
मुंबईत गोवर रोगाच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…
-
लहान मुलांसाठी खास ‘बुनी बियर्स' चित्रपटाचे पोस्टर लॉंच
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - असं म्हणतात की…
-
केंद्र व राज्य सरकारच्या पापाची हंडी फोडणार आहे - यशोमती ठाकुर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - काँग्रेस नेत्या…
-
लवकरच बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी निघणार तोडगा
मुंबई/प्रतिनिधी - राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे.…
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्ड व केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या किनारी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात…
-
केडीएमसी क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांचे…
-
कोविड हा आजार होता, नंतर त्याचा बाजार केला - आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवली विभा कंपनीच्या जागेत…