महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

वाहन चोरी व मोबाईल चोरी गुन्हयातील दोन आरोपींना कोनगाव पोलीसांनी केली अटक

भिवंडी/प्रतिनिधी – मागील काही दिवसापासून भिवंडीत वाहन चोरीसह मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी पोलोसांकडून प्रयत्न सुरु असून वाहन चोरी व मोबाईल चोरी गुन्हयातील दोन आरोपींना कोनगाव पोलीसांनी केली अटक केल्याची माहिती कोनगाव पोलोसांनी दिली आहे.               

कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पराग भाट व तपास पथकातील अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी फकीर मोहम्मद नजीर इनामदार ( वय ३० वर्षे, रा. कल्याण ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने दोन मोटार सायकल व एक ऑटो रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली असून हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.             

त्याचबरोबर मोबाईल फोन चोरी करणारा आरोपी फिरोज रजा मोहम्मद शरीफ शेख ( वय २३, रा. रांजणोली , मुळगाव- जि. फैजाबाद, उत्तरप्रदेश ) याचा कसोशीने शोध घेवून त्यास साईबाबा मंदीरासमोरून ताब्यात घेवुन त्याचेकडून एपल आय फोन कंपनीचा एक मोबाईल व ओपो कंपनीचा एक मोबाईल असे दोन फोन जप्त करून त्यास अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींकडून कोनगाव पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोनगाव पोलीसांनी दिली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×