महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image देश लोकप्रिय बातम्या

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेस नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

नेशन न्युज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी- केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे  कोल्हापूर-मुंबई दरम्यान विमानसेवेचे उद्घाटन केले.

 येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राजीव गांधी भवनात आयोजित कार्यक्रमात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया  यांच्या  हस्ते  विभागाचेराज्यमंत्री जनरल(निवृत्त) व्ही.के. सिंह, अपर सचिव उषा पाधी  यांच्या उपस्थितीत कोल्हापूर -मुंबई  विमानसेवेचे  दूरदृष्य प्रणालीद्वारे  उद्घाटन झाले. पुढील वर्षी मार्च महिन्यात कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे(डोमेस्टिक टर्मिनल) उद्घाटन करण्यात येईल ,असे आश्वासन श्री.सिंधिया यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमास कोल्हापूर विमानतळाहून खासदार सर्वश्री संजय मंडलिक, ध्यैर्यशिल माने,धनंजय महाडिक आदि तसेच  पंढरपूर येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

 नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान योजनेंतर्गंत देशातील २ टियर आणि ३ टियर शहरांना विमानसेवेने जोडण्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर आणि मुंबई शहरांमध्ये ही विमानसेवा सुरु झाली आहे. या उभय शहरांदरम्यान स्टार एअरच्यावतीने आठवडयात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवसांमध्ये ही  विमानसेवा असेल. 

 मंत्री सिंधिया आपल्या संबोधनात म्हणाले की, देशातील जनतेला रास्तदरात विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘उडान योजना’ सुरु केली आहे. आतापर्यंत देशातील ४३३ मार्गांवर ही सेवा सुरु झाली असून १ कोटींच्यावर जनतेने या सेवेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमातळाच्या देशांतर्गत टर्मीनलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे आश्वासनही   श्री सिंधिया यांनी यावेळी दिले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×