नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबईतील डी वाय पाटील रुग्णालयाच्या गेटवर काल रात्री सव्वा आठच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी एका रुग्णवाहिका चालकाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार रात्री सव्वा आठच्या सुमारास तीन इसमांनी एका रुग्णवाहिका चालकाचा पोटात,मानेवर चाकूने वार करून खून केला,मयत व्यक्तीच्या सोबत आणखी एकाला मारण्याचा प्रयत्न फसला,घटनेचा तक्रारदार आणि सुदैवाने हल्ल्यातून वाचलेल्या ज्ञानेश्वर नाकाडे यांनी रुग्णवाहिका पळवून नेल्याने तो वाचला आहे. तर युवराज सिंह याला आपला जीव गमावावा लागला आहे.
पोलीस घटनेचा अधिक तपास करीत,तीन आरोपी जेरबंद झाले असून हल्याचे कारण अचंबित करणारे निघाले आहे. रुग्णालयाबाहेर एका नारळ विक्री महिलेचे नारळ चोरताना मयत रुग्णवाहिका चालकाने व्हिडिओ काढले म्हणून त्याच्या अंगावर चाकूने सपासप वार करून ठार केले.मात्र सव्वा आठच्या सुमारास घडलेल्या आणि प्रसिद्ध डी वाय पाटील रुग्णालयाच्या आणि नागरिकांनी गजबजलेल्या गेटवर खुनी हल्ला झाल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.