नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
मुंबई/प्रतिनिधी – घरासमोरील मोकळ्या मैदानात खेळत असताना अज्ञात इसम शिवडी कोळीवाडा येथून चिमुकल्याला घेऊन गायब झाला होता. मुलगा हरवला आहे हे समजताच मुलाच्या आई-वडिलांनी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.मुलाचा शोध सुरू असताना दोन अज्ञात इसमांनी मुलाला वडाळा पोलीस ठाण्यात आणून जमा केले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करत असताना त्यांनी सांगितले की, सानिका नावाच्या परिचित महिलेला हे मुल सापडले होते आणि वडाळा पोलीस ठाण्यात जमा करण्याकरिता ती त्याला घेऊन जात होती.
सानिकाला पोलीस ठाण्यात बोलवल्यानंतर चौकशी दरम्यान दोन इसमांनी गुन्ह्याची कबुली ही दिली. सानिकाने या मुलांना कल्याणमध्ये विक्री करण्याकरिता घेऊन गेली होती. मात्र तिकडे विक्री झाली नसल्यामुळे त्यांना ती परत आणत होती.
चौकशीअंती या गुन्ह्यात सानिका वाघमारे व तीचे साथीदार पवन पोखरकर, राजेंद्र बोंबले यांना अटक करण्यात आली आहे. याआधी या दोघांनी किती मुलांची विक्री केली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.