नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ” विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०” पहिला टप्पा माहे ऑगस्ट २०२३ मध्ये महापालिका क्षेत्रात २६ नागरी आरोग्य केंद्र व ४ रुग्णालय यांच्या मार्फत राबविण्यात आला.
या मोहिमेत लसीकरणापासनू पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे व गरोदर माता यांचे शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्यात येते. पहिल्या टप्प्यात दि. ०७/०८/२०२३ ते १२/०८/२०२३ दरम्यान ३७६४ बालकांना व ४२९ गरोदर मातांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले.
केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत निश्चित केलेले गोवर स्वेला आजाराचे दुरिकरण करण्याचे ध्येय साध्य करावयाचे आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहिम दि. १९/०९/२०२३ ते १६/०९/२३ या दरम्यान ६ कामकाजाच्या दिवसांमध्ये राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेची अंमलबजावणी वैद्यकीय आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. मोहिमेतील विशेष लक्ष (MR) गोवर रूबेला, (PCV) न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट व्हॅक्सीन व (3rd fIPV) फॅक्शनल इन अॅक्टीव्हेटेड पोलिओ व्हॉयरस कॅक्सीन या नव्याने नियमित लसीकरण कार्यक्रमात सुरु करण्यात आलेले व यासह इतर नियमित लसीकरण पूर्ण करुन घेणे असे आहे. त्याचप्रमाणे गरोदर महिला यांचे ही लसीकरण करण्यात येणार आहे.
सदर मोहिम दि. १९/०९/२०२३ ते १६/०९/२०२३ सकाळी ९.०० वा पासून सायं. ४.०० वा पर्यंत कडोंमपा रूग्णालये व नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात राबविणेत येणार आहे. तरी सर्व सुजाण नागरीकांना या निवेदनाद्वारे आवाहन करणेत येत आहे की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रीय सहभाग घेवून आपल्या बालकांचे व मुलामुलीचे तसेच गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करून त्यांना संरक्षीत करावे. मोहिमेच्या ठिकाणी येतांना बालकांना व गरोदर मातांना नास्ता किंवा जेवण करुन आणावे अशी सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.