कल्याण/प्रतिनिधी – कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रात्री – अपरात्री रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धडपड आणि गैरसोय लक्षात घेता कल्याण डोंबिवली महापालिकेने रात्रीच्या वेळेत रुग्णांची योग्य ती व्यवस्था होण्यासाठी रात्रीच्या वेळेत मध्यवर्ती वॉर रूम सुरु केलं आहे.
सध्याच्या कोविड साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत कोविड रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेषत: रात्रीचे वेळी होणारी धावपळ कमी करण्याच्या दृष्टिकोनातुन महानगरपालिकेने मध्यवर्ती वॉररूमची उभारणी केली असून हि वॉररूम संध्याकाळी ६ ते सकाळी १० या वेळेत कार्यरत रहाणार आहे.
रूग्णासांठी लागणाऱ्या रुग्णवाहिका, बेड मॅनेजमेंन्ट यासाठी सायंकाळी ६ ते सकाळी १० यावेळेत भ्रमणध्वनी क्रमांक 8591377229 व 8591373936 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Related Posts