Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

८ फूट खोल ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या ३ पिल्लांचा केडीएमसी फायर ब्रिगेडने वाचवला जीव

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – सोसायटीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांचा जीव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवला. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली सोसायटीत आज सकाळी हा प्रकार घडला.या सोसायटीच्या ड्रेनेज चेंबर्समध्ये कुत्र्याचे पिल्लू पडल्याची माहिती केडीएमसी फायर ब्रिगेडला सोसायटीतील रहिवाशांनी दिली. त्यानूसार केडीएमसी फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि या पिल्लाना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र चेंबरमधील अरुंद असणारी जागा आणि त्यात अडकलेल्या पिल्लाच्या ओरडण्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांचा जीवही कासावीस झाला होता. मात्र कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आणि आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून या कुत्र्याच्या पिल्लाची सुटका केली. 

चेंबरमध्ये अडकलेल्या या पिल्लाला बाहेर काढण्यास आणखी थोडा जरी वेळ लागला असता या इवल्याशा पिल्लांच्या जीवावर बेतले असते अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. या तीनही पिल्लांना ड्रेनेज चेंबरमधून बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले.तर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या विनायक लोखंडे, राहुल भाकरे, निखिल इशाने, युवराज राठोड आदींच्या टीमने या ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X