नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – कल्याणच्या स्काय वॉक वर मोलमजुरी करून राहणाऱ्या सकीना नावाच्या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्याचा कॉल महात्मा फुले पोलिसांना आला.दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्कायवॉक वर धाव घेतली.पोलिसांनी इतर महिलांना मदतीसाठी पाचारण करत दिलावर ला तातडीने स्ट्रेचर आणण्याच्या सूचना दिल्या.या सर्वांनी मिळून या महिलेला प्रसूतीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले.
मात्र रुग्णालयाने तिला दाखल करून घेण्यास नकार दिला.रुग्णालयात दाखल असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनीही अनेक वेळा विनंती करूनही त्यांनी महिलेला दाखल करुन घेतले नाही.यादरम्यान या महिलेची जवळपास प्रसूती होत आल्याने अखेर फिरस्ता महिलांनीच रुग्णालयाच्या बाहेरील रस्त्यावर या महिलेची प्रसूती केली.अखेर याबाबत वरिष्ठ पोलिसांनी रुग्णालयातील वरिष्ठांना कळविल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला आत नेत महिलेसह बाळाला वायले नगर येथील प्रसूती केंद्रात पाठवले.
या प्रकरणी संबंधित घटना घडली तेव्हा नेमकं काय झालं? कोणते कर्मचारी उपस्थित होते याच्या चौकशीचे आदेश पालिका आयुक्ता कडून देण्यात आले असून सीसीटीव्ही सुद्धा तपासले जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.