कल्याण प्रतिनिधी– कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना आता कोवीड लसही पुढील दोनच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे कोवीड लस लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास लसीकरण केंद्र नाईलाजस्तव बंद ठेवावी लागणार असल्याची भिती केडीएमसी आरोग्य केंद्राने वर्तवली आहे.
राज्य सरकारकडून केडीएमसीला कोविशील्ड लस उपलब्ध करून दिले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे 9 शासकीय आणि 13 खासगी रुग्णालयांत सध्या कोवीड लसीकरण केले जात आहे. लसीकरण सुरू केल्यापासून आतापर्यंत दिवसाला सरासरी 4 हजार 500 नागरिकांचे लसीकरण होत असून आतापर्यंत 80 हजारांच्या आसपास लोकांनाच लस देण्यात आली आहे. तर बुधवारी जवळपास 6 हजार लोकांना लस दिली असून या पार्श्वभूमीवर उपलब्ध साठा केवळ दोनच दिवस पुरेल इतकाच आहे. रविवारपासून लसीकरण करणे शक्य नसून खासगी रुग्णालयानाही लस पुरवठा करता येणार नाही. कोवीड लसीकरणाचा कल्याण डोंबिवलीतील वेग पाहता पुढील फक्त 2 दिवसच ही लस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. हा साथ संपल्यानंतर नाईलाजास्तव लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागतील अशी माहिती केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे.
तसेच आतापर्यंत आपण शासनाकडे 7 लाख लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची मागणीही केडीएमसीने शासनाकडे केली आहे.
- April 8, 2021